व्हिडिओ न्युज

Video शॉपिंग मॉलमध्ये आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू


पाकिस्तानमधील कराची येथील एका शॉपिंग मॉलला शनिवारी (दि.२५) आग लागली. कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलमध्ये लागलेल्या या आगीत ११ जण ठार, तर एक जण जखमी आहे.



आगीच्या दुर्घटनेतून २२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना कराची येथील जेपीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे

पाकिस्तानातील जिओ न्यूजने याविषयी माहिती सांगताना म्हटले आहे की, कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे शॉपिंग मॉलमध्ये  (दि.२५) पहाटे ही आग लागली. अग्निशमन दलाने सुमारे ५० जणांची मॉलमधून सुटका केली आहे. परंतु, आणखी काही जण इमारतीतच राहिले आहेत, तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत जखमी झालेल्या अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिओने दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button