व्हिडिओ न्युज

‘बाबा पुन्हा एकदा हसतील,’ वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या लेकीचा VIDEO


वर्ल्डकपमधील पराभव भारतीय संघाच्या फार जिव्हारी लागला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र गंडला आणि ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव करत करोडो भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली.

भारताची कामगिरी पाहता यावेळी विश्वविजेता होईल याची सर्वांनाच खात्री होती. पण अगदी अखेरच्या क्षणी अपेक्षित कामगिरी न झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाने तोंडचा घासच हिरावून घेतला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाले होते. रोहित शर्मा मैदानातून परतत असताना त्याचे पाणावलेले डोळे पाहून चाहत्यांनाही गहिवरुन आलं होतं. त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच आता रोहित शर्माच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रोहित शर्माच्या लेकीचा हा व्हिडीओ तसा जुना आहे. एक वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओ समायरा बोलत आहे की, “तो (रोहित शर्मा) रुममध्ये आहे. तो सकारात्मक असून एका महिन्यात पुन्हा एकदा हसेल”.

टी-20 वर्ल्डकप आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान काही रिपोर्ट्सनुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आता टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत. पण हे रिपोर्ट फेटाळले जात आहेत. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या टी-20 मधील भवितव्याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे ते दोघं जो काही निर्णय घेतली तो बीसीसीआयला मान्य असणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button