व्हिडिओ न्युज

Video :दोन तरुणी एकाच तरुणासाठी आपसात भिडल्या ,भररस्त्यात त्यांनी केली हाणामारी


प्रेम कधी कुठे कसं कुणाव र होईल सांगू शकत नाही. तसंच एकाच व्यक्तीवर किती जणांचं प्रेम असेल तेसुद्धा सांगू शकत नाहीत. असाच एक तरुण ज्यावर दोन-दोन तरुणींचा जीव जडला.दोघीच्या त्या एका तरुणासाठी भांडू लागला. फक्त भांडण नव्हे तर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

महिलांची भांडणं तशी नवी नाहीत. अगदी चाळीतल्या नळापासून ते लोकल ट्रेनपर्यंत ही भांडणं पाहायला मिळतात. तरुणींच्या अशाच भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यात दोन तरुणी एकाच तरुणासाठी आपसात भिडल्या आहेत. भररस्त्यात त्यांनी हाणामारी केली आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या तरुणी भांडत आहेत. एक तरुणी तर इतकी चवताळली आहे की ती दुसरीला सटासट मारत सुटते. कधी हातांनी मारते, तर कधी पायांनी लाथा मारते. केसही ओढते. त्याचवेळी एक महिला आणि काही तरुणी ही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तरुणी बिलकुल ऐकत नाही. एक तरुणी तर भांडण सोडवायला आलेल्या तरुणीला ढकलून देते.

ही घटना नेमकी कधीची आणि कुठे घडली आहेत ते माहिती नाही. पण पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे भांडण एका तरुणावरून झालं आहे.

@gharkekalesh एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button