व्हिडिओ न्युज

Video :प्रचार रॅलीमध्ये चालकाने कचकचून ब्रेक दाबल अन मंत्री मोहोदय गाडीच्या टपावरुन थेट खाली


तेलंगणमधील मंत्री आणि बीआरएसचे नेते के. टी. राव यांचा एक विचित्र अपघात झाला आहे. एका निवडणूक प्रचार रॅलीमध्ये चालकाने कचकचून ब्रेक दाबल्याने मंत्री मोहोदय प्रचारासाठी आणलेल्या गाडीच्या टपावरुन थेट खाली कोसळले आहेत.निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर येथे हा विचित्र प्रकार घडला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गाडीच्या टपावर उभं राहून हे नेते मंडळी मतदारांना हात उंचावून अभिवादन करत असतानाच गाडी अचानक थांबते. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने टपावर उभे असलेले नेते संतुलन गेल्याने खाली पडतात.

नक्की घडलं काय?

के. टी. राव यांच्याबरोबरच निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्याबरोबर फिरत असलेले जिवन रेड्डी आणि सुरेश रेड्डीही गाडीवरुन थेट खाली जमीनीवर पडले. या सर्व नेत्यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. या सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या अपघाचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केला आहे. अपघातानंतर सावरलेल्या या तिन्ही नेत्यांनी पुन्हा आपला रोड शो सुरुच ठेवला. के. टी. राव हे जीव रेड्डीच्या समर्थनार्थ प्रचारात सहभागी झाले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button