व्हिडिओ न्युज

VIDEO : मित्रांच्या पार्टीत अशा पाहुण्याची एंट्री,पांढरे झाले डोळे


काही वेळा पार्टीत बिनबुलाया मेहमान आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. अशाच तीन मित्रांच्या पार्टीत एका पाहुण्याची एंट्री झाली. पण या पाहुण्याला पाहूनच सर्वांना घाम फुटला.



पाहुणा इतका खतरनाक की त्याला पार्टीतून बाहेर काढण्याची हिंमतही कुणाची झाली नाही. या पार्टीचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

तीन मित्र केक पार्टी करत होते. त्यांची मस्त मजामस्ती, गप्पा सुरू होत्या. इतक्या मागून एक असा पाहुणा आला ज्याचा कुणीच विचारही केला नव्हता. बोलता बोलता या तिघांचंही लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्यांना धक्काच बसला. आता हा पाहुणा कोण हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रात्रीची वेळ आहे. तिन्ही मित्र एकत्र पार्टी करायला बसले आहेत. त्यांच्यासमोर केक आहे. आजूबाजूला रोषणाई आहे. अगदी सुंदर असं वातावरण. अचानक मागे तुम्ही पाहाल तर तिथं एक सिंह येतो. त्या तिघांकडे पाहून सिंह त्यांच्याच दिशेने येतो. बोलता बोलता एका व्यक्तीचं लक्ष तिकडं जातं आणि तो गारच पडतो. त्याचे डोळे मोठे होतात. त्याचे मित्र त्याला काय झालं असं विचारतात, तेव्हा तो इशाऱ्याने सिंह आल्याचं दाखवतो. तेसुद्धा सिंहाला पाहतात आणि मग काय त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं दिसतं.

 

व्हिडीओ पाहताना आपल्याही हृदयाची धडधड वाढते. आता सिंह काय करतो हे पाहण्याची उत्सुकताही वाढते. पण या व्हिडीओत तरी सिंह या तिघांना काही करताना दिसत नाही आहे. तो अगदी शांत आहे. व्हिडीओ नीट पाहिला तर सिंहासोबत एक व्यक्ती आहे. कदाचित हा सिंह बाळलेला असावा. असे काही देश आहेत, जिथं सिंह पाळणं सामान्य आहे.

@HumansNoContext नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button