ताज्या बातम्या

मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या आंदोलकाच्या नातेवाइकास दिलेला चेक झाला बाउन्स…


छत्रपती संभाजीनगर : आपातगाव येथील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या गणेश कुबेर यांच्या कुटुंबीयाला शासनाने दिलेला दहा लाख रुपयांचा धनादेश अनादर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.



धनादेशावरील स्वाक्षरी अधिकृत नसल्याचा शेरा मारून हा चेक बँकेने न वटता परत पाठवल्याचे कुबेर यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २६ ऑक्टोबर रोजी गणेश काकासाहेब कुबेर यांनी आपतगाव येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेनंतर संतप्त जमावाने तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा,मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या आणि मयताच्या वारसाला शासकीय नोकरी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यावेळी गावकऱ्यांनी घेतली होती .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देशमुख आणि इतरांनी मध्यस्थी करून शासनाची 10 लाखाची मदत या कुटुंबाला मिळवून दिली होती. मात्र, मृताची पत्नी उर्मिला कुबेर यांना दिलेला दहा लाख रुपयांचा धनादेश बँकेने न वाटता परत पाठवण्याची बाब आज समोर आली. मृताचा भाऊ भरत कुबेर यांनी याविषयी लोकमतला सांगितले की, धनादेश बँकेत टाकण्यापूर्वी आणि नंतरही यांच्याशी संपर्क मात्र त्यांनी आमचे फोन घेतले नाही.

संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करा
मराठा आरक्षणावरून सतत मराठा समाजाची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारने मयत तरुणांच्या कुटुंबीयांना दिलेल्या मदतीचे धनादेशही अनादर केले राज्य सरकार आणखी किती मराठा समाजाची थट्टा करणार असा प्रश्न सामाजिक अभिजीत देशमुख यांनी उपस्थित केला चेक बाउन्स करणाऱ्या तहसीलदारावर निलंबनाची कारवाई करावी आणि संबंधित कुटुंबा च्या बँक खात्यात सदर रक्कम आरटीजीएस करावी अशी मागणी त्यांनी केली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button