बीड

पुन्हा एका मराठा तरुणाचं टोकाचं पाऊल, आरक्षणासाठी संपवलं आयुष्य….


मनोज जरांगे यांनी या तरुणांचं बलिदान वाया जाऊ न देण्याचा निर्धार केलाय. तसेच त्यांनी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेईन असा निर्धार त्यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यात केलाय. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपलं असून त्यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे.बीड : मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय. दसऱ्याच्या दिवशी बीडमधील (Beed) एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये.

बीड जिल्ह्यातील शहाजानपूर तालुक्यामध्ये एका 23 वर्षीच्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन त्याचं आयुष्य संपवलं. शरद मते असं या तरुणाचं नाव आहे. आयुष्य संपवण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं असा एक मजकूर त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता. दरम्यान मागील चार दिवसांमध्ये दोन तरुणांनी आयुष्य संपवलं.

शरदने त्याच्या घरामागील शेतात जाऊन गळफास घेतला. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात जोर धरत आहे. त्यातच अनेक तरुण या मुद्द्यासाठी आयुष्य संपवत असल्याच्या घटना समोर येतायत. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचं म्हटलं जातय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील या तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन केलंय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button