व्हिडिओ न्युज

Video: ‘वीणा संतूर’ इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू..


मुंबई : मुंबईतील कांदिवली इथल्या वीणा संतूर इमारतीला दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत दोन जणांना होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर आग नियंत्रणात आणली.



सध्या फायरकुलिंगचं काम इथं सुरु आहे. पण ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.
मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील वीणा संतूर इमारतीला दुपारी १२.२७ वाजता ही आग लागली. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीच्या बाजूला असलेल्या या इमारतीच्या ग्राऊंड आणि पहिला मजला अशा दोन मजल्यांवर ही आग भडकली.

सुरुवातीला या आगीत एक वृद्ध महिला आणि एक लहान मुलासह तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. पण आता यात इतर दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती एबीपी माझानं दिली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button