महत्वाचे

रात्री झोपण्यापूर्वी प्या, ५ भन्नाट फायदे-शरीराला मिळेल भरपूर एनर्जी..


झोपताना अनेकांना गार दूध पिण्याची सवय असते. यामागे झोप गाढ लागते, पोट भरलेले राहते किंवा आणखी काही ना काही कारणे असतात. थंडीच्या दिवसांत किंवा सर्दी-खोकला होण्याच्या काळात या दुधात हळद आणि गूळ घालून प्यायले जाते.तर एरवी कोणी गुलकंद, तूप तर कोणी प्रोटीन पावडर घालून दूध पितात. लहान मुलांना आणि ज्येष्ठ मंडळींना तर आवर्जून रात्री झोपताना दूध दिले जाते. रात्रू दूध पिण्याचे शरीराला निश्चितच फायदे आहेत. मात्र या दुधात आणखी एक गोष्ट घातल्यास शरीराला नेहमीपेक्षा जास्त फायदे तर मिळतातच पण एनर्जी टिकून राहण्यासही याची चांगली मदत होते. सुकामेवा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आता सुकामेव्यातील असा कोणता घटक आहे जो दुधात घातल्यास शरीराचे पोषण होण्यास मदत होते (Amazing health benefits of cashew milk).

दूधात सुकामेव्यातील कोणती गोष्ट घालावी?

काजू हा सुकामेव्यातील आवडीचा घटक असून बरेचदा येता जाताही आपण काजू अगदी सहज तोंडात टाकतो. काजुमुळे शरीराला बरेच फायदे होतात कारण यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, प्रोटीन, झिंक, फॉस्फरस असे बरेच उपयुक्त घटक असतात. पाहूया दुधात काजू घालून प्यायल्याने त्याचे शरीराला नेमके कोणते फायदे होतात…

(Image : Google )
१. हृदयासाठी फायदेशीर

काजू घातलेले दूध हृदयासाठी अतिशय फायदेशीर असते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. हे दोन्ही घटक शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करतात आणि हृदयाचे कार्य स्थिर राहण्यास त्याची अतिशय चांगली मदत होते. यामुळे हृदयाशी निगडीत समस्या नियंत्रणात येण्यास मदत होते.

२. हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त

काजू घातलेले दूध हाडांना पोषण देण्यास अतिशय फायदेशीर असते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम या घटकांची मात्रा चांगली असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी याची चांगली मदत होते. हाडांना ठिसूळ होण्यापासून वाचवण्यासाठी हे दूध उपयुक्त ठरत असल्याने ऑस्टीओपोरोसिससारख्या समस्यांपासून दूर राहण्यास याची चांगली मदत होते.

३. प्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर

काजूच्या दुधामुळे प्रतिकारशक्ती वाढते याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे यातील अँटीऑक्सिडंटस फ्री रॅडीकल्सशी लढतात आणि रोग प्रतिकार विरोधी क्षमता वाढवण्यास मदत करतात. काजूच्या दुधामुळे शरीराच्या विविध भागांवरील सूज कमी होण्यासही चांगली मदत होते.

४. रक्तातील साखरेचे प्रमाण राहते नियंत्रणात

ज्यांना डायबिटीस आहे अशांनी आवर्जून काजूचे दूध प्यायला हवे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये असलेला अनाकार्डीक अॅसिड हा घटक रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास फायदेशीर असते.

५. लोहाची कमतरता होते दूर

अॅनिमियाग्रस्त लोकांसाठी काजूचे दूध हा एक उत्तम उपाय असतो. काजूत लोहाचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हे पेय प्यायल्याने लोहाची कमतरता भरुन निघण्यास मदत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button