मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


लखनऊ: समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे आज निधन झालं आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना गुरुग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्या पत्नी आणि प्रतीक यादव यांच्या आई तसचे भाजप नेत्या नेत्री अपर्णा यावद यांच्या सासू होत्या.

साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मुलायम सिंह यादव यांच्या पहिल्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या आई मालती देवी यांचे 2003 साली निधन झालं होतं. त्यानंतर त्यांनी साधना गुप्ता यांच्याशी दुसरा विवाह केला होता.

गेल्या आठवड्यात साधना गुप्ता यांना फुफ्फुसांचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याना फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. तसेच त्यांना शुगर आणि इतरही त्रास होता. आज त्यांचे निधन झाले.