ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

एकनाथ शिंदे ठाणे शहरासाठी मोठी तरतूद,527 कोटींचा निधी तात्काळ देण्याचे आदेश


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॉस्पिटल (Thane Civil Hospital) नवीव बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यात निर्माण होणारं नवं सिव्हील हॉस्पिटल हे 900 खाटांचे होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यासाठी वेगळं धरण उभारण्याची घोषणा केली आहे.

ठाणेकरांचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून एकामागेएक चांगल्या कामांचा सपाटा लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी मोठी तरतूद केली आहे. ठाण्यातील जुन्या सिव्हील हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हे हॉस्पिटल तब्बल 900 खाटांचे इतकं मोठं उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी रखडलेली टेंडर प्रक्रिया पुढच्या 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यासाठी मंजूर झालेला 527 कोटींचा निधी तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी शिंदे यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरल्याची माहिती समोर आली आहे.
भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, नियोजित खाटांची संख्या वाढवून 900 खाटांच्या प्रस्ताव शासनास्तरावर पाठविण्यात आला होता. त्यासही मान्यता मिळाली होती. जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 527 कोटींच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button