ताज्या बातम्यामहत्वाचे

“येत्या तीन वर्षांत भारत चीनला मागे टाकेल..’; सीमेवरील पायाभूत सुविधांचा होणार विकास


नवी दिल्ली – भारत-चीन सीमा  विवादाच्या दरम्यान, भारत आपली सुरक्षा व्यवस्था वाढवत आहे आणि वास्तविक नियंत्रण रेषेवर पायाभूत सुविधा विकसित करण्यात व्यस्त आहे. ज्या वेगाने या सुविधा विकसित केल्या जात आहेत, ते पाहता येत्या तीन वर्षांत भारत चीनला  मागे टाकू शकेल.



बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) महासंचालक (डीजी) लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी ही माहिती दिली.

चौधरी यांच्या मते, गेल्या 30 महिन्यांत 300 हून अधिक प्रकल्प सुरू झाले आहेत. दर तीन दिवसांनी आम्ही एक प्रकल्प पूर्ण करत आहोत. आमचे जवळपास 80 टक्के प्रकल्प एलएसी म्हणजेच लडाख आणि अरुणाचल प्रदेशात आहेत.

याबाबत सध्या आपण चीनच्या मागे आहोत, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या विकासाचा प्रवास 1960 च्या दशकात सुरू झाला. जोपर्यंत रस्ते आणि रेल्वेचा संबंध आहे, ते सतत त्यांच्या विस्तार आणि विकासात व्यस्त आहेत, परंतु आपण विजेच्या वेगाने पुढे जात आहोत.

सीमेवरील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या वेगाबाबतीत यूपीए आणि एनडीएच्या दृष्टिकोनाची तुलना करून ते म्हणाले, मागील सरकारचा दृष्टिकोन पुराणमतवादी होता. पण सध्याचे सरकार आक्रमक आहे आणि या आक्रमकतेमुळेच आम्ही आमचे ध्येय साध्य करू शकलो आहोत.

यावर्षी आतापर्यंत, बीआरओने 90 प्रकल्प पूर्ण केले आहेत ज्यात 24 मोक्‍याचे रस्ते, दोन हवाई क्षेत्र आणि 61 पुलांचा समावेश आहे. अंदाजानुसार, डिसेंबरअखेर त्यात आणखी 60 प्रकल्पांची भर पडणार आहे.

तथापि, अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे कारण चीन सीमेवर बंकर, भूमिगत आश्रयस्थान, तोफखाना, रडार साइट्‌स तसेच रस्ते, पूल, बोगदे आणि हेलिपॅडद्वारे शेवटच्या माईल कनेक्‍टिव्हिटीच्या बाबतीत आपली लष्करी स्थिती मजबूत करत आहे. भारताचा सामना करण्यासाठी त्याने आपला एअरबेस देखील अपग्रेड केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button