‘हायप्रोफाईल’ पार्टीवर छापा,फार्महाऊसवर दहा ते पंधरा मुलींसह झिंगाट

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर : हिंगणा परिसरातील जामठा परिसरात असलेल्या फार्महाऊसवर सुरू असलेल्या ‘हायप्रोफाईल’ पार्टीवर पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास छापा टाकण्यात आला.

यामध्ये मोक्का आरोपी सुमित ठाकूर याच्यासह १० ते १५ जणांना अटक केली. यावेळी पार्टीतून मोठ्या प्रमाणात दारू साठा आणि मुलीही ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नामवंत बिल्डर असलेल्या छगन पुनजीभाई पटेल (वय ६५ रा. रामदासपेठ) यांच्या जामठा परिसरातील खरसमारी शिवारात गिरणार नावाचा फार्महाऊस आहे. तिथे रविवारी पार्टी करण्यासाठी पोलिसांकडून रितसर परवानगी घेण्यात आली. मात्र, परिसरात मोठ्या आवाजात डिजे वाजत असून तिथे दारू पित हंगामा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पेट्रोलिंगवर असलेले पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी गुन्हेशाखेचे पथक, स्थानिक हिंगणा पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास छापा टाकला.

यावेळी फार्महाऊसवर दहा ते पंधरा जण मुलींसह झिंगत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला. यावेळी १० ते १५ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये नुसताच जामिनावर सुटून आलेला मोक्का आरोपी सुमित ठाकूर याचाही समावेश होता. दरम्यान पोलिसांनी हिंगणा छगन पुनजीभाई पटेल (वय ६५ रा. रामदासपेठ), शिव वडेट्टीवार (वय ३२ रा. रहाटे कॉलोनी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.