ताज्या बातम्या

धावत्या कारला आग,भीषण आगीमुळे कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू


नोएडामध्ये धावत्या कारला आग लागल्यानं रस्त्यावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नोएडाच्या सेक्टर ११९ मधील आम्रपाली प्लॅटिनम सोसायटीजवळ ही घटना घडली. शुक्रवारी रात्री अचानक धावत्या कारला आग लागली. या भीषण आगीमुळे कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला.



आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र कारमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश आलं नाही. कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांची ओळख पटलेली नाही. त्यासाठी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आम्रपाली प्लॅटिनम सोसायटीत कारला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यातले दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला बोलावले असून गाडीची आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button