Social Viral Newsव्हिडिओ न्युज

एका झटक्यात भयानक प्राण्याने बकरीला केले गिळंकृत, काही सेकंदाची शिकार अन् दृश्यांनी संपूर्ण इंटरनेट हादरलं


सो शल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे कधी काय दिसेल याचा नेम नाही. इथे अनेक थरारक आणि चमत्कारी व्हिडिओज शेअर केले जातात, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित देखील अनेक व्हिडीओज व्हायरल होत असतात.

 

आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जंगलातील एक प्राणी एका बकरीला निर्दयपणे गिळंकृत करताना दिसून आला. बकरीची शिकार करण्यासाठी त्याला फारसा वेळ लागत नाही आणि अवघ्या काही सेकंदातच तिला गिळून टाकतो. शिकारीचे हे थरार दृश्य आता सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत काय घडले याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

 

काय घडलं व्हिडिओत?

 

व्हिडिओ येथे पहा !

 

अलिकडेच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोमोडो ड्रॅगनने एका बकरीला जिवंत गिळल्याचे दिसून येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोमोडस ड्रॅगनला जगातील सर्वात मोठा सरडा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बकरी जमिनीवर पडलेली दिसते. कदाचित ती बकरी आधीच मेली असेल. मेलेल्या बकरीला पाहून, एक महाकाय कोमोडो ड्रॅगन हळूहळू बकरीकडे सरकतो आणि त्याला आपला शिकार बनवतो. अवघ्या काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगन, संपूर्ण बकरीला गिळंकृत करतो. हे दृश्य इतके धोकादायक वाटते की ते पाहून लोकांना कापरा भरला. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर युजर्सद्वारे याला शेअरही केले जात आहे.

 

हा व्हायरल व्हिडिओ @UnscriptedFacts नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कोमोडो ड्रॅगनने संपूर्ण बकरीला ३ सेकंदात गिळून टाकले’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ४ मिलियनहुन अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत तर अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या भयानक शिकारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, ‘हे खूप चुकीचे आहे. मी त्या सर्व वाईट सरपटणाऱ्या प्राण्यांना मारून टाकेन. ही एक अशी प्रजाती आहे जी नामशेष होण्यालायक आहे’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ‘त्याने इतक्या कमी वेळात त्याला कसे गिळले असावे’.

 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button