ती जीवाच्या आकांतानं ओरडत होती, पोलिसांना फोन लावा.. हायवेवर रक्तबंबाळ होईपर्यंत जोडप्याला मारहाण …

ना शिक : नाशिकमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायवेलगत एका जोडप्याला दोन तरूण मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाऊस पडत असताना महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती, पोलिसांना फोन लावा रे..
शेवटचं माफ करा अशी गयावया मारहाण करणाऱ्यांना करत होती. मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. त्यातील एक जण तर मारहाण करत असताना दुसऱ्याला दगड आणायला लावत होता. नेमकी ही घटना काय आहे जाणून घ्या.
व्हिडिओ येथे पहा !
या हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेल्या तरूणाचे रोहित गोरडे असे नाव आहे. रोहित याला लाकडी दांड्याने डोक्यावर वार करण्यात आला आहे.नाशिकमधील इंदिरानगरच्या बोगद्याजवळ ही सर्व मारहाणीची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. इंदिरानगर बोगद्याजवळ जुन्या वादातून सशस्त्र हल्ला झाल्याची माहिती समजत आहे.
‘आज तुझे कामच वाजवतो’ म्हणत मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये दोन महिलांसह विधानसभा निवडणूक लढवलेल्या शरद पवार गटाच्या नेत्याच्या नातेवाइकाला अटक करण्यात आली आहे. मयुरी गोरडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये दीपक कपिले आणि दिगंबर उर्फ दत्ता आंधळे यांनी मारहाण केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.