गप्पा मारत रेस्टॉरंटमध्ये जेवत होते, एक घास घेतला अन् अचानक छत तोडून आला एक भयानक हात …

थायलंडमध्ये नेहमीसारखा एक दिवस,अनेक लोक एका खास रेस्टॉरंटमध्ये जमले होते, हसतखेळत गप्पा मारत होते, तेवढ्यात छत तुटण्याचा आवाज आला आणि एक भयानक हात तेथून खाली आला, ते पाहून प्रचंड गोंधळ उडाला.
व्हिडिओ येथे पहा !
थायलंडमध्ये नेहमीसारखा एक दिवस,अनेक लोक एका खास रेस्टॉरंटमध्ये जमले होते, हसतखेळत गप्पा मारत होते, तेवढ्यात छत तुटण्याचा आवाज आला आणि एक भयानक हात तेथून खाली आला, ते पाहून प्रचंड गोंधळ उडाला.
एका रेस्टॉरंटमध्ये लोक जेवत असताना एक मोठा मॉनिटर सरडा (Monitor Lizard) छत तोडून थेट खाली कोसळला. ही संपूर्ण घटना तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.बँकॉकमधील एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली, जिथे लोक आरामात बसून जेवत होते, तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला आणि छताचा एक भाग तुटून पडला.
मात्र छताला भगदाड पडाताच मोठ्या सरड्यासारखा हा प्राणी थेट जमिनीवर पडला आणि रांगत रांगत टेबलाखाली लपला. या अनपेक्षित घटनेने रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेले ग्राहक घाबरले. काही लोक ओरडू लागले, काही घाबरून खुर्च्यांवरून उठले आणि अनेक जण तर भीतीपोटी लगेच रेस्टॉरंटमधून बाहेर पळाले. या मॉनिटर लिझार्डला पाहून असे वाटलं की जणू एखाद्या ॲक्शन चित्रपटातील दृश्य आहे. अनेकांना ते दृश्य पाहून ‘जुरासिक पार्क’ची देखील आठवण आली.
वर पाहिल्यावर दिसला भयानक हात
हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि युजर्सनी तर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्या सीनला हॉरर चित्रपटाचा ट्रेलर म्हटलं, तर आता बाहेर जेवणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया एकाने दिली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब स्थानिक वन्यजीव अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्या मॉनिटर लिझार्डला सुरक्षितपणे पकडले आणि त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि सर्व ग्राहक सुरक्षित आहेत.
छत फोडून पडली मॉनिटर लिझार्ड
थायलंडमध्ये मॉनिटर लिझार्ड हे सामान्यतः दिसतात, परंतु निवासी भागात किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांचे अचानक दिसणे दुर्मिळ आहे. तज्ञांच्या मते, उष्णता आणि अन्नाचा शोध यामुळे ते मानवी क्षेत्रांकडे आकर्षित होऊ शकतात. या व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे आणि लोकांकडून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.