एकनाथ शिंदे यांनी असं काय सांगीतल? देवेंद्र फडणवीसांनी लावला डोक्याला हात
विधानसभा अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र, फटकेबाजी करतानाही त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचंड हसवले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री भेट कशी व्हायची? याचा खुलासा शिंदेंनी केला. शिंदेंच्या या खुलाशानंतर फडणवीसांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली.
“मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो”. एकनाथ शिंदे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका, अशी म्हण्याची वेळ फडणवीसांवर आली. एकनाथ शिंदेच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
“फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे ११५ आणि आमचे ५० असे मिळून १६५ झाले. अजितदाद तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे १६५ नाही, आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणणार,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.