छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

राज ठाकरे यांच्या सभेत गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे गांधीनगर झोपडपट्टी, बीड येथील


औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी झालेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेदरम्यान नांदेड मनसेच्या पदाधिकाऱ्याची २० तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली होती.ही साखळी सिटी चौक पोलिसांनी परत मिळवली असून, दोन चोरट्यांना अटक केली
दत्ता श्रीमंत जाधव आणि उमेश सत्यभान टल्ले (दोघेही रा. गांधीनगर झोपडपट्टी, पेठ बीड ता. जि. बीड) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. दत्ताला पुण्यातून तर उमेशला बीडला पोलिसांनी उचलले.

नांदेड येथील मनसेचे पदाधिकारी मॉन्टीसिंग जहागीरदार हे कार्यकर्त्यांसह वाहनाने सभेसाठी आले होते. रात्री आठच्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी प्रवेशद्वारावर गर्दी होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील ही सोनसाखळी हिसकावण्यात आली. सिटी चौक पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून सोनसाखळी हिसकावणारे हे बीड येथील असल्याचे आढळले. पो.नि. गिरी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार, जमादार विलास काळे, देशराज मोरे, अभिजीत गायकवाड यांच्या पथकाने बीड येथे शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अधिक तपासाअंती दत्ता पुण्यात व उमेश बीडला सापडला. कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी चोरीची कबुली देत सोनसाखळी काढून दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button