ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

भारताची चांद्रयान-३ मोहिम, पाकिस्‍तानचे माजी मंत्री काय म्‍हणाले..


आजचा दिवस भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. पाकिस्‍तानही या मोहिमेकडे मोठ्या उत्‍सुकतेने पाहत आहे. यावर पाकिस्‍तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी आपली प्रतिक्रिया दिली आहे.



Chandrayaan-3 Mission : …हा तर मानवजातीसाठी ऐतिहासिक क्षण

पाकिस्‍तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी भारताच्‍या चांद्रयान-३ मोहिमेबाबत ट्विटरवर म्‍हटलं आहे की, आज भारताचे चांद्रयान-३ चंद्रावर लँडिग करणार आहे. मी सर्व भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. कारण हा क्षण मानवजातीसाठी ऐतिहासिक असणार आहे.
पाकिस्‍तानने चंद्रावर लॅडिंगचे थेट प्रक्षेपण करावे

पाकिस्‍तानच्‍या माध्‍यमांनी बुधवारी सायंकाळी भारताच्‍या यानाचे चंद्रावरील लँडिगचे थेट प्रक्षेपण करावे, असे आवाहनही फवाद चौधरी यांनी केले आहे. भारताचे चांद्रयान ३ मोहिम मानव जातीसाठी खास करुन भारतातील प्रत्‍येक नागरिक, शास्त्रज्ञांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे. भारतातील अंतराळ समुदायाचे खूप खूप अभिनंदन, असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button