शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जल्लोषात स्वागत
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जल्लोषात स्वागत
शरद पवार सभेसाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जल्लोषात स्वागत केलं आहे. सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात शरद पवार गटाचे पहिले पक्ष कार्यालय नाशिकमध्ये सुरू
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून तात्पुरत्या स्वरूपात नवीन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ मुख्य कार्यालयाच्या शेजारीच शरद पवार गटाकडून हे कार्यालय तयार करण्यात आले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकची व्यवस्था व्हावी, यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. सत्तेचा वापर आणि पोलिसांच्या मदतीने मुख्य कार्यालय अजित पवार गटाने बळकावल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसेच मुख्य कार्यालय राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावावर असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही कार्यालय ताब्यात घेऊन, अशी माहिती शहराध्यक्ष गजानन शेलार व जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी दिली.
बालेवाडीजवळ मुंबई बंगळूर महामार्गालगत एका चारचाकी वाहनाने घेतला पेट
बालेवाडी येथे मुंबई बंगळूर महामार्गालगत एका चारचाकी वाहनाने पेट घेतला आहे.त्यामुळे रस्त्यावर नागरिकांनी बरीच गर्दी केली आहे. तसेच येथे वाहतूक कोंडी झाली आहे. ही घटना नुकतीच घडली असुन अग्निशमन दल आग विझवत आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणील सुनावणीसाठी खासदार संजय राऊत, सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर
पत्राचाळ घोटाळा प्रकरणील सुनावणीसाठी खासदार संजय राऊत, सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर झाले आहेत. आज आरोप निश्चिती होणार आहे. गुरू आशिष कंस्ट्रक्शनसाठी पत्राचाळ घोटाळ्याचा खटला थांबवून ठेवायचा का? असा सवाल मागील सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं केला होता. कंपनीची जबाबदारी घेण्यास कुणीही पुढे येत नसल्यानं आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली आहे. ईडीनं बनवलेल्या आरोपी क्रमांक 4 वरील कंपनीचं प्रकरण NCLTत प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर आज महत्वाची सुनावणी होणार आहे.
शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना; कार्यकर्त्यांकडून फुलांचा वर्षाव
शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना झाले आहेत. वाटेत कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात आहे.
जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी RPF जवान चेतन सिंहला केले बडतर्फ
जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी RPF जवान चेतन सिंहला बडतर्फ करण्यात आले आहे. आर पी एफ च्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी चेतनला बडतर्फ केलं आहे. चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात तीन प्रवाशांसह ASI टिकाराम मीना यांचा मृत्यू झाला होता. सध्या चेतन सिंह ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात भर्ती आहे.
शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना
आज बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शरद पवार संभाजीनगरवरून बीडकडे रवाना झाले आहेत.
बीडमध्ये आज शरद पवारांची तोफ धडाडणार
आज बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात ही सभा होत आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाची तयारी सुरू
लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे. कालपासून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ठाकरेंच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. आज नगर, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या बैठका होणार आहेत. आज दुपारी 12 वाजल्यापासून बैठकांना सुरुवात झाली आहे. काल झालेल्या बैठकांमध्ये भाजपच्या विरोधात लढण्याच्या तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
या बैठकीला मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख उपस्थित राहणार आहेत