ताज्या बातम्या

तिथवली येथील ग्राम सचिवालयाचे उद्या आ. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन


तिथवली येथील ग्राम सचिवालयाचे उद्या उद्घाटन



कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी

  • नव्याने बांधण्यात आलेल्या तिथवली येथील ग्राम सचिवालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि.दुपारी 2 वाजता होणार आहे. कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.
    आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून व वैभववाडी भाजपा अध्यक्ष, माजी जि. प. अध्यक्ष नासीर काझी यांच्या पाठपुराव्यामुळे सन 2021- 22 जनसुविधा योजनेतून ग्राम सचिवालयाची आकर्षक व भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच प्रशस्त सभागृह, सरपंच, सचिव व डाटा ऑपरेटर यांची दालने आहेत. या उद्घाटन सोहळ्याला शासकीय अधिकारी, कर्मचारी, गावातील ग्रामस्थ, परिसरातील नागरिक, गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी, बचत गट प्रतिनिधी, अनेक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, ग्राम पंचायत सदस्य, पदाधिकारी, युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच प्रियांका हरयाण यांनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button