ताज्या बातम्या

पोलीस असल्याची बतावणी करत नागरीकांना लुटत होता, ३० गुन्हे दाखल असलेला, आंतरराज्यीय गुन्हेगार निघाला!


नसरापूर : भोर तालुक्यात नसरापूर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करत नागरीकांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार जाफर हुसेन इराणी याला अटक केली आहे.



पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस असल्याची बतावणी करत नागरीकांची फसवणुक करून त्यांचेकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरी करत असल्याचे गुन्हे भोर विभागात दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून दोन अधिकाऱ्यांसह एक पथके नेमले होते. भोर विभागातील पोलीस बतावणी करून फसवणुकीचे गुन्हयांचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आजुबाजूचे साक्षीदार यांचेकडे तपास केला.

उपलब्ध फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, भोर विभागात पोलीस बतावणी करून गुन्हा करणारी आंतरराज्यीय टोळी असून त्याचा म्होरक्या १) जाफर हुसेन इराणी (सध्या रा कोंढवा पुणे) हा त्याचा कर्नाटक राज्यातील साथीदारासह गुन्हा करत आहे.

मिळालेल्या बातमीच्या आधारे तपास पथकाने जाफर इराणी याची माहिती प्राप्त केली असता, तो पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे येथे राहणारा असून सध्या सिल्हवर स्टार सोसायटी बिल्डींग ५०२, कोंढवा पुणे येथे राहणेस असल्याची माहिती मिळाल्याने त्यास कोंढवा परीसरातून सापळा लावून पथकाने ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी करता त्याने साथीदार सादीक रफिक इराणी (रा. कोंढवा पुणे मुळ रा. गुंडलिक, कर्नाटक) याच्या मदतीने राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहेत.

राज्यात इतर ठिकाणी केलेले गुन्हे देखील उघड

आरोपी जाफर इराणी यास विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने भुईंज, सातारा, तसेच गोवा राज्यातील पोरवोरिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जाफर इराणी हा गुन्हे करताना वेगवेगळया साथीदारांना सोबत घेवून गुन्हे करतो.

सदर आरोपीवर पुणे शहरात मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करणेत आलेली असून त्याचेवर पुणे शहरात ९, अहमदनगर, नवी मुंबई, मुंबई शहर, कर्नाटक राज्यात १८ असे एकूण ३० गुन्हे दाखल आहेत. आरोपी जाफर इराणी हा सध्या चार गुन्हयांमध्ये निष्पन्न झाला असून, अशा गुन्हे पद्धतीचा वापर करून गुन्हा घडला असल्यास नागरीकांनी नजीकचे पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीसांकडून करणेत आलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, मंगेश भगत यांनी केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button