जनरल नॉलेजदेश-विदेश

चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत …तर 10 दिवसांत पृथ्वीवर परत येईल चांद्रयान 3 !


चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आले आहे. चांद्रयान-3 हे चंद्राभोवती दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे.

5 ऑगस्टला चांद्रयान-3 हे चंद्राच्या पहिल्या कक्षेत आणले जाणार आहे. चंद्राभोवती पाच दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालणार आहे. कक्षा बदलत असताना चांद्रयान-3 चा वेग कमी केला जाणार आहे. या दरम्यान, काही तांत्रिक अडचणी आल्यास चांद्रयान-3 हे 10 दिवसांत पृथ्वीवर परत येईल.

चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर आता सर्व गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. 25 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 ने पृथ्वीबोवतीच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करुन चंद्राच्या कक्षेच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 1 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री 12:03 ते 12:23 दरम्यान ट्रान्सलुनर इंजेक्शन (TLI) पार पडले. आता चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आले आहे. आता पाच दिवस प्रवास करत चांद्रयान-3 हे 5 ऑगस्टला चंद्राच्या पहिल्या कक्षेत आणले जाणार आहे.

1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आलेल्या ट्रान्सलुनर इंजेक्शनवेळी प्रोपल्शन मॉड्यूलचे इंजिन सुमारे 20 मिनिटे चालू होते. यात 179 किलो इंधनाचा वापर करण्यात आला. पृथ्वीच्या पाच कक्षा पूर्ण करताना सुमारे 500-600 किलो इंधन खर्च झाले आहे. प्रक्षेपणाच्या वेळी सुमारे 1696.39 किलो इंधन प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये भरले होते. म्हणजेच सुमारे 1100-1200 किलो इंधन अजून शिल्लक आहे.

चांद्रयान 3 ची पहिली कक्षा ही चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 11 हजार किलोमीटर आहे. चंद्राभोवती पाच वेळा कक्षा पूर्ण झाल्यानंतर चांद्रयान 3 ची गती कमी केली जाईल. यानंतर चांद्रयान 3 चंद्राच्या 100 किलोमीटरच्या कक्षेत आणले जाईल. 17 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया केली जाईल. या दरम्यान प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. 18 आणि 20 ऑगस्ट रोजी लँडर मॉड्यूल डिऑर्बिटिंग होईल. म्हणजेच, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल हळूहळू चंद्राच्या 100×30 किमीच्या कक्षेत जाईल. यानंतर, 23 ऑगस्ट रोजी सुमारे सव्वा सहा वाजता लँडिंग होईल.

चंद्रावर गुरुत्वाकर्षण न मिळाल्यास चांद्रयान-3 परत येणार

चांद्रयान-3 हे सध्या ताशी 38,520 किलोमीटर वेगाने चंद्राच्या दिशेने जात आहे. यानाचा वेग हळू हळू कमी केला जात आहे. चांद्रयान 3 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 11 हजार किलोमीटर दूर गेल्यावर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शून्य होईल. चंद्राचे गुरुत्वाकर्षणही शून्याच्या जवळ असेल. याला L1 पॉइंट म्हणतात. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा 6 पट कमी आहे. त्यामुळे चांद्रयान-3 चा वेगही कमी करावा लागणार आहे. यादरम्यान चांद्रयान-3 चा वेग चंद्राच्या गुरुत्वाकर्षणासह मॅच न झाल्यास चंद्राची कक्षा पकडता येणार नाही. यामुळे चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे कठीण होईल. असे झाल्यास चंद्रयान 3.69 लाख किलोमीटरवरून पृथ्वीच्या पाचव्या कक्षेच्या पेरीजीवर परत येईल. 230 तासांत 236 किलोमीटर अंतरावर परत येईल. म्हणजे सुमारे 10 दिवसांनी चांद्रयान-3 हे पृथ्वीवर परत येईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button