ताज्या बातम्या

भाओजींना मेहुणीचं लग्न होणं आवडलं नाही, जीवे मारण्याची दिली धमकी


राजस्थानच्या चुरू जिल्ह्याच्या सरदारशहर भागात एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीच्या साखरपुड्यानंतर तिच्या लग्नाची तारीख जवळ आली तर तिच्या भाओजींना हे आवडलं नाही.तरूणीचा आरोप आहे की, तिच्या दोन भाओजींनी तिच्या लग्नात आडकाठी घातली. यामुळे तिला घरातून पळून जाऊन लव्ह मॅरेज करावं लागलं. आता ते तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तरूणी तिच्या पतीसोबत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.तरूणी लक्ष्मी सैनीने सांगितलं की, ती मनोज सैनीला बालपणापासून ओळखत होती. 3 महिन्यांपासून त्यांच्या प्रेमसंबंध सुरू होते. नुकतीच मे महिन्यात परिवाराने त्यांचा साखरपुडा केला. लग्नाची तारीख जवळ येत असताना तिच्या भाओजींनी लग्नात आडकाठी घातली. लक्ष्मीने सांगितलं की, भाओजींनी तिच्या आई-वडिलांना भडकवलं ज्यामुळे तिचा साखरपुडा मोडण्याच्या स्थितीवर आला.

मात्र, लक्ष्मीला मनोजसोबत लग्न करायचं होतं. तिने कुटुंबियांना हे सांगितलं. पण कुटुंबिय सुद्धा लग्न मोडण्यावर अडून बसले. अशात 6 जून रोजी लक्ष्मी मनोजसोबत पळून गेली आणि गाझियाबादला पोहोचली. इथे त्यांनी आधी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. त्यानंतर कोर्टात लग्न केलं.

लक्ष्मीनुसार दोघांच्याही लग्नाची सूचना कुटुंबियांना मिळाली तर ते सगळे नाराज झाले. लक्ष्मीचा आरोप आहे की, तिचे दोन्ही भाओजी तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. धमकीनंतर लक्ष्मी मनोजसोबत एसपीच्या ऑफिसमध्ये गेली आणि दोघांनी सुरक्षेची मागणी केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button