क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

दिल्ली, झारखंडसह देशभरात हिंदू मुलींच्या हत्या, तत्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा’


या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना व हिंदू राष्ट्र जागृती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सातारा : दिल्ली, झारखंडसह देशभरात हिंदू मुलींच्या हत्येच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. या घटनेत सहभागी लव्ह जिहाद्यांना तत्काळ शिक्षा व्हावी, तसेच देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना व हिंदू राष्ट्र जागृती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या वेळी  निवेदन देण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर गलांडे यांना निवेदन दिले. या वेळी हिंदू महासभेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख कार्यवाह दत्तात्रय सणस, हिंदू महासभेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश गांधी, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, कुंभार महाराज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोरेगाव तालुका प्रमुख अजय बर्गे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे योगेश कापले, वैभव पिसाळ, इस्कॉनचे लक्ष्मण रसाळ, विश्‍व हिंदू परिषदेचे जितेंद्र वाडकर, रणरागिणी शाखेच्या रूपा महाडिक, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे उपस्थित होते.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button