क्राईम

आईने पोटच्या मुलाचे तुकडे केले; मग डोकं शिजवून खाल्लं, कारण काय?


नवी दिल्ली : एका आईने आपल्या अवघ्या 5 वर्षाच्या मुलासोबत जे काही केलं आहे ते कोणालाही हादरवणारं आहे. तिने आपल्या मुलाची मोठ्या आकाराच्या चाकूने हत्या केली.

ही महिला एवढ्यावरच थांबली नाही, तर पुढेही तिने अत्याचार केले. निर्दयी आईने मुलाच्या डोक्याचा काही भाग शिजवून खाल्ला. यानंतर तिने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले. ती हे तुकडे पुरण्यासाठी जात असतानाच तिला पकडण्यात आलं.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं हे प्रकरण इजिप्तचं आहे. आरोपी महिलेचं वय 29 वर्षे असून तिचं नाव हना मोहम्मद हसन आहे. तपासात असं दिसून आलं की महिलेनं गुन्हा केला कारण तिला तिच्या माजी पतीला आणि त्याच्या कुटुंबाचा मुलाशी कोणताही संपर्क होण्यापासून रोखायचं होतं. आरोपी महिलेला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

तिने मुद्दाम तिचा मुलगा युसूफचा जीव घेतला. याप्रकरणी तिला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हनाने आपल्या मुलाच्या डोक्यावर शस्त्राने तीन वार करून त्याची हत्या केली.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मात्र, त्यांना दफन करण्यापूर्वीच तिला अटक करण्यात आली. आधी तिने कसायाप्रमाणे मुलाचं शरीर तुकडे करून छिन्नविछिन्न केलं आणि नंतर मुलाचं डोकं तसंच इतर भाग उकळत्या पाण्यात शिजवून ते खाल्ले. युसुफच्या काकांना घरातील बादलीत शरीराचे अवयव सापडले तेव्हा ही घटना उघडकीस आल्याचं आधीच्या वृत्तात म्हटलं आहे.

तपासानुसार, घटनेच्या वेळी हना पूर्ण शुद्धीवर होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारच्या औषधांचा कोणताही परिणाम झालेला नव्हता. हनाला अटक केल्यानंतर तिने मुलाच्या डोक्याचा काही भाग शिजवून खाल्ल्याची कबुली दिल्याने पोलीस अधिकारी शॉक झाले. कारण तो कायम तिच्यासोबत असावा अशी तिची इच्छा होती.

हनाच्या माजी पतीने स्थानिक मीडियाला सांगितलं की, जेव्हा तो आला तेव्हा पोलिसांनी भयानक दृश्यामुळे त्याला त्याच्या मुलाला पाहू दिलं नाही. माजी पतीने सांगितलं की तो आणि हना चार वर्षांपासून वेगळे राहत होते. कारण तिला तिच्या वडिलांकडून घर वारसा मिळाला होता आणि संपूर्ण कुटुंबाने तेथे जावं अशी तिची इच्छा होती. पण जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा हनाच्या स्वतःच्या इच्छेनुसार हे नातं पूर्णपणे संपुष्टात आलं.

घटस्फोटानंतरही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण हनाने नकार दिला आणि ती ठाम राहिली. कुटुंबाविरुद्ध ती मुलाच्या मनात विष भरत होती. वकील समीर मोहम्मद सालेह यांनी सांगितलं की, चेहऱ्यावर कोणतेही भाव न येता, हनाने पोलिसांना सांगितलं की, ‘मला माझ्या मुलाला आणि मला मुक्त करायचं होतं. मला बदला घ्यायचा होता. त्याचे वडील सतत घरी यायचे आणि त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button