ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध


बीड जिल्ह्यातील (Beed District) वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक अपेक्षाप्रमाणे बिनविरोध झाली आहे.

ज्यात मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे या कारखान्याची स्थापन केली होती. दरम्यान यावेळी होणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) एकत्र आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. त्यानुसार वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, अॅड. यशश्री मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्यासह 21 जणांचा बिनविरोध संचालकांमध्ये समावेश झाला आहे.

बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी 9 मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. तसेच 11 जून रोजी मतदान घेण्याचे ठरले. संचालकपदाच्या 21 जागांसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर 1 जून रोजी म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीतून भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शिल्लक राहिलेले 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

या कारखान्यासाठी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता.
त्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे भाजप खासदार प्रतीम मुंडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
तर सुरवातीपासूनच संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती.
दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रिंगणात असलेल्या 16 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उरलेले 21 जण बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध निवडून आलेले संचालक

बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मिक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतू कराड, शिवाजीराव गुट्टे, शिवाजी मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे यांचा समावेश आहे.

मुंडे बहिण-भाऊ एकत्रित आले

काही दिवसांपूर्वी झालेल्या बाजार समिती निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच निवडणुकीत असेच काही चित्र गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळायचे. मात्र वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत उलटे चित्र होते. कारण या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंड हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button