ताज्या बातम्या

पॉलीहाऊसमध्ये शेती करणारा शेतकरी मालामाल, महिन्याला कमावतो १ लाखाचे पॅकेज


काकडी खाणे प्रत्येकाला पसंत आहे. काकडीत व्हिटॅमीन डी, पोटॅशीयम, फास्फरस, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी १, व्हिटॅमीन बी ६, व्हिटॅमीन सी आणि आयरानची मात्रा असते. नियमित काकडी खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त राहते. तसेच काकडीत फायबरही मोठ्या प्रमाणात असते. काकडी खाल्यामुळे शौचास साफ होते. त्यामुळेच काकडीची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी पॉलीहाऊसमध्ये काकडीची शेती करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळत आहे.



पॉलीहाऊसमध्ये काकडीची शेती केल्यास उन्ह, पाऊस, वादळ, लू आणि थंडी यांचा परिणाम होत नाही. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये पॉलीहाऊसमध्ये शेती करू शकता. यामुळे उत्पादन वाढते. शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतो.

असेच एक शेतकरी आहेत दशरत सिंह. दशरत यांनी पॉलीहाऊसमध्ये शेती सुरू केली. यातून त्यांचा चांगला फायदा होत आहे. दशरत सिंह अलवर जिल्ह्यातील इंदरगडचे रहिवासी आहेत. ते खूप कालावधीपासून पॉलीहाऊसमध्ये काकडीची शेती करतात. यातून त्यांना चांगला नफा मिळतो.

दशरत सिंह आधी पारंपरिक शेती करत होते. त्यांना पॉलीहाऊसबाबत माहिती नव्हती. त्यानंतर ते उद्यान विभागाच्या संपर्कात आले. त्यांना पॉलीहाऊसमध्ये शेती करण्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ४ हजार वर्ग मीटरमध्ये पॉलीहाऊस तयार केले. त्यात काकडीची शेती सुरू केली.

दशरत सिंह यांचा मुलगा लखन यादव याने सांगितले की, पॉलीहाऊसमध्ये सुपर ग्लो बीजाचा वापर करतात. यामुळे पिकाची वाढ चांगली होते. काकडीचे उत्पन्न ४ ते ५ महिने निघते. काकड्या विक्री करून ते सहा लाख रुपये निव्वड नफा मिळवतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button