ताज्या बातम्या

धाडस ध्येयाप्रत नेत, निकाल निष्कर्षाप्रत नेतात आणि, आयुष्य भराचा संघर्ष मनुष्यधर्म जागवतो


धाडस ध्येयाप्रत नेत,
निकाल निष्कर्षाप्रत नेतात आणि,
आयुष्य भराचा संघर्ष मनुष्यधर्म जागवतो,
याचा अनुभव घेतलेला सर्वसामान्य माणूस म्हणजे मी,

काल माझा वाढदिवस झाला,
गेले महिनाभर सर्व शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता,काय करायचं,कसा साजरा करायचा यावर आमची प्राथमिक चर्चा झाली प्रत्येकाने वेगवेगळी मत मांडली,

सरते शेवटी आम्ही सर्व शिवसैनिकांनी असच वेड धाडस भर उन्हाळ्यात सामाजिक गरजेपोटी करायचं ठरवलं,गेले बरेच दिवस मी बातम्यां मधून ऐकत होतो की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा आहे तेव्हा ब्लड बँकेत चौकशी केली खातरजमा केली आणि वस्तुस्थिती किती भयानक आहे हे समजलं,तरीही सावध पावलं टाकली,ब्लड बँक वाल्यांनी देखील सांगितलं की ऐन उन्हाळयात प्रतिसाद
कमी मिळतो,

तरीदेखील आम्ही ठरवलं,प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे,नाही जमल तर आमच्या कार्य क्षमतेवर शंका घेतली जाईल एव्हढच,परंतु जमलं तर एक होईल ज्याला गरज आहे त्याची निकडीची गरज भागवली जाईल..

बघता बघता सर्व शिवसैनिकांनी मनावर घेतल,दोन दिवसात नियोजन केलं तेही माझ्या अनुपस्थितीत आणि सर्वांना आवाहन करून एक चांगला पायंडा वाढदिवसाच्या दिवशी पाडला तोही रक्त दात्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमध्ये,

विशेष करून गुरुकुल अकादमीचे श्री व सौ संदीप टिळेकर यांचे आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व विद्यार्थी,

सासवड मधील व्यावसायिक श्री समीर चौधरी,सामाजिक भान असलेले सर्व सहभागी युवक आणि विविध गावातून आलेले असंख्य ग्रामस्थ,शिवसैनिक,पदाधिकारी यांचे मनापासून आभार ते रणरणत्या उन्हात देखील आपण दिलेल्या अमूल्य योगदाना बद्दल,रक्तदाता झाल्याबद्दल..

अजूनही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सर्व मित्र
परिवार आणि आम्हा शिवसेनेचा प्राण असलेल्या सर्वच शिवसैनिकांनी आप आपल्या विभागात केले होते,

विशेषत्वाने आमचा सौरभ कुंभारकर ज्याने रक्तदान तर केलेच परंतु आम्हा सर्व सनाथांची देखील माय असलेल्या
स्व सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात खाऊ वाटपाच आयोजन केलं होत,

उप तालुका प्रमुख श्री राजाभाऊ क्षीरसागर,श्री राहुल यादव, आमचे समन्वयक श्री संतोष भोसले,संघटक श्री दत्तात्रेय गाडेकर,युवा उपअधिकारी श्री दीपक दळवी,

नीरा कोळ विहिरे गणाचे गणप्रमुख श्री मोतीराम गावडे,
कैलास कटके हेमंत सुकल,सासवड शहर प्रमुख युवा श्री कुणाल जगताप वाल्हे शहर प्रमुख श्री हरीश दुबळे,श्री गायकवाड यांनी देखील सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम ठेवला..

संपूर्ण रक्तदान शिबिराचे ज्यांनी यशस्वी आयोजन केले ते युवासेनेचे तालुका अधिकारी श्री शुभम उर्फ दादा झिंजुरके सासवड शहर शिवसेना शहर प्रमुख श्री राजेंद्र जगताप,
हिवरे येथील युवा उप अधिकारी श्री अक्षय गायकवाड, सासवड उपशहर प्रमुख राजेंद्र धोत्रे,निलेश गिरमे,सोमनाथ कटके,सोशल मीडियाचे आकाश जगताप,

महिला आघाडी सहीत रक्तदान करणाऱ्या महिला आघाडी प्रमुख सौ प्रियांका सुकल,

जेष्ठ शिवसैनिक श्री सुदाम भाऊ शिनगारे,श्री बाळासाहेब लोळे,सोशल मीडिया प्रमुख श्री संजय चाचर,शिवदूत श्री कामठे,मारुती पवार,नीरा शहर प्रमुख श्री सुदाम बंडगर,
यांनी देखील उपस्थित राहून शिवसैनिकांचा उत्साह वाढवला,

दरम्यानच्या काळात विविध राजकीय सामाजिक संघटना, शिवसेना पक्षचे नेते,प्रशासकीय अधिकारी,वैद्यकीय विधी विमा क्षेत्रातील मान्यवर,रिक्षा ट्रक टेम्पो संघटना चालक मालक,फळ भाजी विक्रेते,सफाई कर्मचारी आणि विविध स्तरातील वयोगटातील सर्वच सन्माननीय बंधुतुल्य,पितृतुल्य प्रतिनिधींनी विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या..

माझ्या छोट्याशा कामाची दखल घेत दरवर्षीप्रमाणे आपल्या स्टेटस रुपी अगणित शुभेच्छा मिळाल्या त्या
सर्वांचे देखील मनापासून आभार..

आभार व्यक्त करून ऋण फेडू शकत नाही,मग ते समाजाचे असोत वा शिवसैनिकांचे..

आयुष्यभर आपल्या ऋणातच राहणे पसंत करेल,

364 दिवस कामात प्रामाणिकपणे व्यग्र राहणे ही तुमच्या 365 व्या दिवशी होणाऱ्या बहुमानाची पावती असते,
मग तो व्यवसाय असो राजकारण अथवा समाजकारण,

असो,
पुन्हा एकदा उपस्थितांचे आभार,

आपला विनीत,
तालुका प्रमुख पुरंदर,
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे,
अभिजित मधुकर जगताप,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button