ताज्या बातम्यामुंबई

ठाकरे गटाला खिंडार पडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!


आगामी मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेकडून ठाकरे गटाला झटका बसण्याची शक्यता आहे. कारण आज ठाकरे गटाचा मुंबईतील एक बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.मुंबईतील एक ठाकरे गटाचा माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रवेश मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी देखील माहिती मिळत आहे.

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे अनेक घडामोडी या पडद्यामागेही घडत आहेत. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याचीदेखील चर्चा आहे. आज भाजपने शिवसेनेचे खासदार ज्या मतदारसंघात निवडून आले तिथे संयोजक नेमल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे काही भाष्य करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेनुसार राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला ६ हजार रुपये देणार आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय इतर महत्त्वाचे देखील निर्णय घेण्यात आले आहेत.


 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button