ताज्या बातम्याराजकीय

Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट म्हणाले…


Sharad Pawar : संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे मत आहे.



 

या सर्व पेचप्रसंगावर खासदार शरद पवार यांनी तोडगा काढावा, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. यावरच आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. एका वृत्त संस्थेच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

काय म्हणाले शरद पवार

 

“महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे,” अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.

 

यावेळी “मुळात संवाद ठेवायला पाहिजे. आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जिवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

 

“गंमत अशी आहे की दुर्दैवाने दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे,” असी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button