इराणी वस्तीतून इराणी ड्रग लेडीला ठोकल्या बेड्या; एमडी ड्रग्जसह चरस हस्तगत

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

डोबिवली :गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या इराणी वस्तीतून पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच इराणी वस्तीतून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची घटना आता उघडकीस आली आहे.एमडी ड्रग्स सह चरस विक्री करणाऱ्या एका महिलेला खडकपाडा पोलिसांनी इराणी वस्तीतून अटक केली आहे. सबा सैय्यद असे अटक आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण जवळ असलेल्या आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत एक महिला एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी कल्याण खडकपाडा पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकला.

यावेळी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिची झडती घेत चौकशी केली असता तिच्याकडे एमडी ड्रग्स सह चरसचा साठा आढळून आला. सबा सैय्यद असे या महिलेचे नाव असून ती या इराणी वस्तीत राहते. पोलिसांनी तिच्याकडून एम डी ड्रग्जसह चरस हस्तगत केले आहे. सबा हिने हे अंमली पदार्थ कोठून आणले, कोणाला विक्री करायची याचा तपास पोलिस करत आहेत.