ताज्या बातम्या

मोदी सरकारची दिवाळी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस..


दिवाळीनिमित्त केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने मंगळवारी (17 सप्टेंबर) दिवाळी बोनस जाहीर केला. या अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप बी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे.



आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने हे निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी, 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी महागाई भत्त्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (अॅड-हॉक बोनस) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (नॉन-राजपत्रित कर्मचारी), जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल.

बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button