ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

साखर कारखानदारी सहकार सम्रांटाकडून कलंकीत दोन वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंधरा हजार कोटींची लूट : विठ्ठल राजे पवार


साखर कारखानदारी सहकार सम्रांटाकडून कलंकीत
दोन वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंधरा हजार कोटींची लूट : विठ्ठल राजे पवार यांचा आरोप.



पंढरपूर : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आसमानी आणि राज्य सरकारच्या सुलतानी संकटामुळे सातत्याने अडचणीत राहिलेला आहे. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत तर राज्यातील सहकार आणि साखर कारखानदारी, सहकार, साखर सम्राटांकडून सहकार मोडीत काढून ५० टक्क्यांहून अधिक गीळंंकृत केल्याचा घनाघाती आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केला.

 

पंढरपूर येथील 1 मे 2023 रोजी शेतकरी संवाद यात्रा सत्याग्रह आंदोलनाच्या निमित्ताने झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते, तेंव्हा अध्यक्षस्थानी जलभूषण भजनदास पवार होते. पुढे ते म्हणाले की राज्यातील साखर सम्राटांकडून गेल्या दोन वर्षांमध्ये तोडणी वाहतूक आणि कॉस्ट प्रोडक्शन मध्ये घोळ करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15000 कोटी रुपयांची लूट साखर आयुक्तालय व साखर आयुक्त प्रधान सचिव व राज्य सरकारमधील नेत्यांच्या संयुक्त विद्यमाने केले गेल्याचा घनाघाती आरोप राजे पवार यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की राज्यामध्ये 204 सहकारी साखर कारखाने, तर हजारो सहकारी संस्था अत्यंत नावारूपाला आलेल्या होत्या मात्र सहकार क्षेत्रातील साखर आणि सहकार सम्राट यांनी बाप जाद्यांची नावे सहकारी संस्थांना देऊन निम्म्याहून अधिक सहकार गिळंकृत करून तो पुन्हा खाजगी स्वरूपात नातेवाईकांच्या करवी, हस्तगत केला असल्याचा आरोप राजे पवार यांनी यावेळी केलेला आहे. ते पुढे म्हणाले बुडालेला सहकार या सम्राटनी तोच सहकार त्या सम्राट त्यांनी खाजगी स्वरूपात विकत घेऊन नफ्यात कसा आणला असा घनाघात केला. तर ८५ सहकारी साखर कारखाने गिळंकृत केलेल्यांची ई डी, चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.? यावर सर्व शेतकरी कष्टकरी कामगार आणि शेतकरी नेत्यांनी नीटपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तर शेतकरी चळवळीतल्या काही बेईमान नेत्यांनी सहकार बुडव्यांना साथ देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील यावेळी राजे पवार यांनी केला ते पुढे म्हणाले की शुगरकेन कंट्रोल ऑर्डर १९६६ चा शुगर केन कंट्रोल ऑर्डर पूर्व कायदा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चा पूर्व कायदा आहे तसा पुन्हा लागू करावेत. यावेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शनामध्ये राजे पवार यांनी राज्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या सहकार खात्याच्या हातून हातातून काढून त्याकडे वर्ग कराव्यात पण मध्ये अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून राज्यातील शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा शेतमाल थेटपणे खरेदी करण्याच्या संदर्भात पणन,ने कार्यवाही करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संबंधित सत्ताधारी नेत्यांनी १९६६ आणि सहकारी संस्था अधिनियम १९६०, या कायद्यामध्ये बेकायदेशीरपणे केलेल्या दुरुस्त्या रद्द करून पूर्वीचे कायदेपूर्ववत करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी आपल्या भाषणामध्ये केली. त्यामुळे सहकारी संस्था आणि शेतकरी हे नावारूपाला येतील अशी मागणी त्यांनी यावेळी उपस्थित उपस्थित शेतकरी व पदाधिकाऱ्यांना केलेल्या आव्हानात नमुद केली आहे.
यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारणीचे प्रदेश अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धेश्वरआप्पा हेंबाडे, सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत नलावडे, पंढरपूरचे युवक अध्यक्ष महेश बिस्किटे, पुणे शहराचे युवकाध्यक्ष अनिल भांडवलकर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील, राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष नंदकिशोर लोखंडे पाटील तर उत्तर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार गुलाबराव पाटील लोखंडे, सायंटिस्टिक व संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार निवृत्ती बराटे, संघटनेचे राष्ट्रीय सचिव इनुस आलम सिद्दिकी, टेकनिकल विभागाचे अध्यक्ष संजय वाडे, महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणी धुमाळ, ठाण्याच्या अध्यक्ष शामल कलगुटकर, डोंबिवली नवी मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष ॲड. मीना सोनवणे, उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष, संपर्कप्रमुख तसेच नेवासा तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंग कोतकर, नेवासा तालुक्याची युवक अध्यक्ष तसेच संघटनेचे सदस्य पठारे , दिलीप वरपे पाटील आदी मान्यवर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारच्या साखर क्षेत्रामधील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी नुकतीच राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे लेखी स्वरूपात केल्याची माहिती राजू पवार यांनी यावेळी दिली.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button