ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

“साखर, सहकार आयुक्तांसह लेखापरीक्षकांविरुद्ध शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना न्यायालयात दाद मागणार.


“शंभर कोटीचे गैरव्यवहार चौकशीला चार वर्षे पूर्ण, तरीही अहवाल सादर नाही! सहकार आयुक्तंकडे कठोर कारवाई बाबत आरजेडी अहवाल सादर करणार ,,



“साखर, सहकार आयुक्तांसह लेखापरीक्षकांविरुद्ध शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना न्यायालयात दाद मागणार… विठ्ठल पवार राजे यांची माहिती.,,

श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांनी केलेल्या 100,शंभर कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे सर्व पुरावे व कागदपत्र हे ऊस उत्पादक शेतकरी यांच्या त्यावेळी ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार राजे, सह सात शेतकरी यांनी ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, साखर आयुक्त, रिजनल डायरेक्टर शुगर नगर नाशिक विभाग, कलेक्टर अहमदनगर, श्रीरामपूर पोलीस स्टेशन व राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केलेली होती परंतु ती अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने संतप्त झालेले संघटनेने आज साखर सहसंचालक कार्यालयांमध्ये ठीया आंदोलन केले.

अशोक सहकारी साखर कारखान्याचे गैरव्यवहारात संदर्भात 2018-19 मध्ये शंभर कोटीचा गैर व्यवहार झालेले पुरावे संघटनेने दाखाल केलेले होते त्यानंतर तीन आणि नंतर एक असे चार लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख , बीके बेंद्रे , एम के शिंगाडे, के एफ गायकवाड यांची नेमणूक केली होती, संघटनेच्या तक्रारीनंतर आरजेडी अहमदनगर यांनी रीमांइडर पत्र, चार ते पाच वेळा अंतिम नोटीस देऊ नही, चारही लेखापरीक्षकांनी अहवाल सादर केलेला नव्हता व नसल्याने त्यांचेवर दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर कारवाई प्रकरणी सहकार आयुक्तांकडे तात्काळ शिफारस करू असे लेखी आश्वासन नगर नाशिक विभागाचे उप रिजनल डायरेक्टर डॉक्टर प्रवीण लोखंडे यांनी दिले आहे. त्यात संबंधित लेखापरीक्षकांचे निलंबन करून, कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केलेली आहे.

संघटनेचे ठिय्या आंदोलनाच्या दणक्यानंतर सहकार आयुक्ताकडे चारही लेखापरीक्षकांवर कठोर कारवाई करण्या बाबतचा पत्रव्यवहार आर जे डी कार्यालय अहमदनगर यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्यात गेल्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या अथक परिश्रमानंतर तसेच सहकार चळवळीचे जनक विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय राव गाडगीळ, वैकुंठाभाई मेहता, यशवंतराव चव्हाण, शंकरराव बाजीराव पाटील, वसंतदादा पाटील यांचे प्रयत्नाने सुमारे 204 सहकारी साखर कारखान्याची नोदणी झालेली होती पैकी 202 साखर कारखान्यांची निर्मिति झाली तर दोन साखर कारखाने काही राजकीय अलीबाबाचे आडमुठेपणामुळे सुरू होऊ शकलेले नाहीत. 1932 ते 99- 2000 पर्यंत सहकार चळवळ व्यवस्थित सुरू होती मात्र त्याला 1990 च्या दशकामध्ये मोठी घुशिने पोखरण लागली आणि 1999 नंतर सहकार क्षेत्राला घरघर लावण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मातब्बर साखर सम्राट सहकार महर्षी, अलीबाबा आणि चाळीस चोर, टोळीच्या अनुयायांनी केले याला केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी व सहकार, साखर खात्यातील बाबूलोक तितकीच दोषी असल्याचा आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक व ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य विठ्ठल पवार राजे यांनी दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय व रिजनल डायरेक्टर शुगर नगर नाशिक विभागात चे कार्यालयात दिवसभर सुरु असलेल्या सत्याग्रह ठीया आंदोलना प्रसंगी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
एफ आर पी चा कायदा सुरू झाल्याच्या नंतर एकदाही एकही साखर कारखान्याने शंभर टक्के एफ आर पी दिलेली नाही हा छातीठोकपणे दावा करत गेल्या 2014 ते 2023 24 यामधील प्रत्येक वर्षीची ऊस शेतकऱ्यांची झालेली, साखर आयुक्तालय व संबंधित साखर आयुक्तांच्या मदतीने साखर सम्राट त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांची लूट केलेली आहे त्या लुटीची उच्चस्तरीय राज्य लेखापरीक्षक यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष यांनी यावेळी केलेली आहे.
यामुळे राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने मोडीत निघाले 202 साखर कारखान्यांमधून आज केवळ 90 ते 95 साखर सहकारी साखर कारखाने कसे तरी अंतिम श्वास घेत आहेत त्यामध्ये श्रीरामपूरचे अशोक सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे याचे सातत्याने दुर्दैव वाटते आहे. सहकारी साखर कारखान्यांमध्ये गैर व्यवहार होत असताना साखर कारखान्याचे संबंधित संचालक मंडळ कार्यकारी संचालक व कर्मचारी ही माहिती असताना त्यांनी ती माहिती लपवलेली आहे आणि तुम्ही देणे हा देखील कर्तव्यात कसूर दप्तर दिल्याने मोठा गुन्हा शाबित होऊ शकतो परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती म्हणून संघटनेच्या वतीने आज सकाळी 11 वाजता सुरू केलेले ठिय्या आंदोलन रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होते शेवटी अशोक सहकारी साखर कारखान्याचे गैर व्यवहाराच्या संदर्भात चौकशी करणाऱ्या चारही लेखापरीक्षकांवर सहकार आयुकांच्या मार्फत कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन आर जे डी डॉ प्रवीण लोखंडे अहमदनगर यांनी दिल्याच्या नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. परंतु येत्या चार ते पाच दिवसात कठोर कारवाई झाली नाही तर 1 मे 2023 पासून पंढरपूर मध्ये शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप सत्याग्रह आंदोलन होणार असल्याची माहिती व इशारा अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी दिली आहे, यावेळी संघटनेचे कार्यकारणी समितीचे प्रदेशाध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक फाळके, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे, खेड तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठल पाटील लोखंडे, नेवासा तालुक्याचे अध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, दौलतराव गंनगे उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष, संदीप गवारे संपर्कप्रमुख, नेवासा तालुका युवक अध्यक्ष दादासाहेब नाबदे, अनिल चव्हाण सह अनेक शेतकरी या वेळेस उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button