क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

Video:मुंबईत किरकोळ वादातून दुकानदारावर तलवारीने सपासप वार


मुंबई :मुंबईत दिवसाढवळ्या दुकानदारावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शहरातील पायधुनी परिसरात दोन तरुणांनी दुकानदारावर तलवारीने हल्ला केला.
हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि दोन्ही तरुणांमध्ये खरेदीवरून वाद झाला, त्याचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले.

 

अमीर रईस अहमद खान आणि विनायक राजू पटेल अशी आरोपींची नावे आहेत.

या दोघांना माहीम येथून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हल्ला का केला? याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button