क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे विवाहितेच्या प्रेमाचा गैरफायदा घेत शारिरीक संबंध,२६ वर्षीय विवाहितेवर बलात्कार


पुणे : प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन संबंध प्रस्थापित केले अन् त्यानंतर ब्लॅकमेल करून २६ वर्षीय विवाहितेवर बलात्कार (Rape in Pune) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने पतीला देखील मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी हेमंत संजय वैराट असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.याबाबत एका २६ वर्षीय विवाहित महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हेमंतने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्याचा गैरफायदा घेत पतीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यांना भेटण्यास बोलवत जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले. पण, विवाहितेने भेटण्यास नकार दिल्यानंतर हे फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली. तसेच वारंवार शरीरसंबंध ठेवले.

विवाहितेने फोन न उचलल्याने तिच्या घरी जाऊन ‘माझा फोन का उचलत नाही? मला भेटायला न आल्यास मी काय करायचे ते बघतो’, असे म्हणत धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात घडताहेत अनेक गुन्हे

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ब्लॅकमेल करून २६ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button