क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

5 मुलांचा बाप शेजारच्या 3 मुलींच्या आईच्या प्रेमात पडला अन पळून गेला..


राजजस्थान : राजजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच मुलांच्या बापाने शेजारी राहणाऱ्या तीन मुलींच्या आईला पळवून नेल्याची घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे ती महिला तिच्या तीन मुलींनाही सोबत घेऊन गेली आहे.



लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. य़ा घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सीकर शहरातील उद्योग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, 38 वर्षीय महिलेला तिचा शेजारी मुकेश नायक याने आमिष दाखवून पळवून नेले. महिलेला तीन मुली आहेत. त्यांचे वय अनुक्रमे 17, 12 आणि पाच वर्षे आहे. तिन्ही मुलीही त्यांच्यासोबत आहेत. याबाबत उद्योगनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुकेशला स्वतःची पाच मुलं आहेत. आरोपीने मुलींसोबत वाईट कृत्य केलं असावं, अशी भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोपीच्या तावडीतून महिलेची व तिच्या मुलींची तात्काळ सुटका करावी. आरोपी एका नेत्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने यापूर्वी चुरू जिल्ह्यातील सुजानगढमधून निवडणूकही लढवली आहे. राजकीय दृष्टिकोनामुळे पोलीस आरोपींवर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे पोलीस अधीक्षक करण शर्मा सांगतात की पोलीस पथक या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे. लवकरच विवाहित महिला सापडेल.

विशेष म्हणजे राजस्थानमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बुंदीमध्ये एका सासरऱ्याने आपल्या सुनेला नेले होते. आणि सिरोही जिल्ह्यात जावय सासूसोबत पळून गेला होता. या दोन्ही प्रकरणांची बरीच चर्चाही झाली होती. आता सीकरमध्ये घडलेली ही घटना चर्चेचा विषय आहे. एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button