क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

कार पलटी होऊन १ ठार तर २ गंभीर जखमी


बीड:केज-कळंब मार्गावर गुरुवारी मध्यरात्री १२:३०च्या सुमारास विठाई पुरम वस्तीजवळ भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार रस्त्याच्याकडेला चहाच्या हॉटेलात घुसून पलटी झाली.
त्यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरूवारी मध्यरात्री १२:३० जालना जिल्ह्यातील परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे व नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे राहणार वाढोना तालुका परतुर हे त्यांच्या कार (एम एच-१७/ ए जे-५३८२) या गाडीने कळंबहुन केजच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. मात्र भरधाव वेगातील गाडीवरचे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. ही कार तेथील एका हॉटेलमध्ये घुसली. या भीषण अपघातात रामेश्वर भास्कर तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे दोघे गंभीर जखमी झाले.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कारच्या बाहेर काढले. जखमींना तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. दरम्‍यान, पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय हलवण्यात आले आहे. या अपघातातील मयत आणि जखमी हे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button