ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

31 वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार !


पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. मुंबई-पुणे-सोलापूर  मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
सध्या 14 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. त्यातील 31 वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. ज्या शहरांमधून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे, त्यात पुणे आणि मुंबईचाही समावेश आहे.मुंबई-पुणे शहरातून ट्रेन

देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत ट्रेन वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली होती. आता मुंबई ते मडगाव, जबलपूर ते इंदूर, हावडा ते पुरी, सिकंदराबाद ते पुणे, तिरुवनंतपुरम ते मंगलुरु, चेन्नई एग्मोर ते कन्याकुमारी, मंगलुरु ते म्हैसूर, इंदौर ते जयपूर ट्रेन लवकरच सुरु होणार आहे.

या ठिकाणी ट्रेन

विजयवाडा ते चेन्नई सेंट्रल, जयपूर ते आग्रा, नवी दिल्ली ते कोटा, नवी दिल्ली ते बीकानेर, मुंबई ते उदयपूर, हावडा जंक्शन ते बोकारो स्टील सिटी, हावडा जंक्शन ते जमशेदपूर, हावडा जंक्शन ते पटना, हावडा जंक्शन ते वाराणसी, विशाखापट्टनम ते शालीमार, भुवनेश्वर ते विशाखापट्टनम, तिरुपती ते विशाखापट्टनम, नरसापूरम ते विशाखापट्टनम, नरसापूरम ते गुंटूर, बेंगलुरु ते धारवाड, बेंगलुरु ते विजयवाडा, बेंगलुरु ते कुरनूल, बेंगलुरु ते कोयंबटूर, एर्नाकुलम जंक्शन ते चेन्नई सेंट्रल, चेन्नई एग्मोर ते मदुरई जंक्शन, चेन्नई सेंट्रल ते सिकंदराबाद आणि बेंगलुरु ते कन्याकुमारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.

1128 प्रवासी क्षमता

या ट्रेनच्या मोटर असलेल्या कोचमध्येही प्रवासी सामावू शकतात. तसेच ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे. एकूण 1128 इतकी प्रवासी क्षमताआहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button