ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

मशिदींवरील त्रासदायक भोंगे उतरावेत ह्यासाठी सनदशीर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना त्रास का दिला गेला?”


 



मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून मनसेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे, याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मनसेकडून प्रश्न विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून ट्वीटद्वारे म्हटले गेले आहे की, “शिवसेना सत्तेत असताना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही. असं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना सांगितल्याचा प्रसंग उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितला. मग उद्धव ठाकरे, आपण मुख्यमंत्री असताना मशिदींवरील त्रासदायक भोंगे उतरावेत ह्यासाठी सनदशीर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना त्रास का दिला गेला?”

 

याशिवाय ”१७००० महाराष्ट्र सैनिकांवर गंभीर स्वरूपाचे खटले का भरले गेले?, आंदोलक महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई करताना ‘विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही’ हा बाळासाहेबांचा विचार तुम्ही विसरला होता का? ‘मशिदींवरील त्रासदायक भोंगे खाली यावेत’ या बाळासाहेबांच्या इच्छापूर्तीसाठी आंदोलन करणं हा महाराष्ट्र सैनिकांचा गुन्हा होता का?” असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेंना थेट विचारण्यात आले आहेत.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

तर, ”विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगतात कि, “आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे आहे.” मग भोंगे आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक मुला-मुलींवर माविआ सरकारने भरलेले खटले आपण केव्हा मागे घेणार?” असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मनसेने विचारला आहे.

याचबरोबर ”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत आपली वाटचाल करत आहे पण एखाद्या प्रश्नावर आंदोलन करताना जेव्हा सरकारी बळाचा वापर करून, गंभीर स्वरूपाचे खटले भरून राजकीय कार्यकर्त्यांना आयुष्यातून उठविण्याचे जे प्रकार होतात ते बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणवणाऱ्यांकडून होऊ शकत नाहीत ! आता ते का झाले, ह्याचं उत्तर उमगण्यास आपण सुज्ञ आहेत.”असंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटलं

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button