क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालविवाह प्रकरणी पती व सासऱ्याला अटक, मुलीच्या प्रसुतीवेळी प्रकार उघडकीस


पिपरी:17 वर्षाच्या मुलीशी बालविवाह करुन तिला गर्भवती केल्याप्रकऱणी पती व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Pimpri) हा सारा प्रकार मुलगी प्रसुतीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी उघडकीस आला.
मात्र दुर्दैवाने यावेळी तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.



याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक अलका भोसले य़ांनी तक्रार दाखल केली असून पती केशव रघुनाथ काळे (वय 21 रा. चाकण) सासरे रघुनाथ लक्ष्मण पवार (वय 45 रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता हि आरोपीची नातेवाईक आहे. ती 17 वर्ष 6 महिन्यांची आहे हे माहिती असताना देखील आरोपीने व त्याच्या वडिलांनी पीडितेचा बालविवाह केला. (Pimpri) पुढे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले. प्रसुतीसाठी तिला पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता तिचा गर्भ मृत्यू पावला. प्रसुतीवेळी मुलीचे वय उघडकीस आल्याने आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चाकण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button