क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिपिकास 37 हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले


लाच घेतांना रंगेहात पकडले



वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपिक 37 हजारांची लाच स्वीकारतांना सापडला

अंबाजोगाई : (स्वप्निल धनवटे बीड )अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यालयातील एक कर्मचारी,लिपीक 37 हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडला असल्याची माहिती समोर आलेली आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आस्थापना विभागात काम करणारा कर्मचारी अशोक नाईकवाडे यास 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल आशियाना येथे रंगेहात पकडले असल्याची माहिती मिळाली आहे. सदरील घटना अधिष्ठाता कार्यातून दुजोरा मिळाला असून अशोक नाईकवाडे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.यासंदर्भात लाचलुचपत विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार अधिष्ठाता कार्यातील लिपिक अशोकराव नाईकवाडे (वय 42 वर्ष) कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदारा यांस यांची मयत सासरे यांच्या जागेवर त्यांचे  पत्नीस अनुकंपावर नोकरी लावतो.म्हणून 80 हजार रुपयांची मागणी केली होती.नंतर 37 हजार रुपयांवर तडजोड होऊन 10 एप्रिल 2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील आशियाना हॉटेल येथे 37 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले.सदरील कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी केली.यावेळी सापळा पथकात पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी,गणेश म्हेत्रे यांचा समावेश होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button