आंघोळ करताना पत्नीचेच चित्रीकरण, व्हायरल करण्याची धमकी देऊन हुंड्यासाठी छळ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आंघोळ करताना पतीने मोबाइलद्वारे पत्नीची चित्रफीत काढली. ती व्हायरल करण्याची धमकी देऊन दहा लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीचा छळ सुरू केला. तिच्या सासू-सासऱ्यांनी दागिनेही हडपले.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी पती व तिच्या सासू-सासऱ्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. महिलेचा पती व सासू-सासरे वाशिम जिल्ह्यात राहतात. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.