ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

पाकिस्तानच्या आंदोलनकर्त्यांना का बसला धक्का? युएईने काश्मीरमध्ये केली गुंतवणूक !


जम्मू काश्मीरमध्ये युएईच्या कंपनीने गुंतवणूक केल्याने पाकिस्तानमधील अॅक्टीव्हीस्ट यावर टीका करताना दिसत आहेत. इस्लामिक देशांनी या गुंतवणूकीद्वारे हा संदेश दिला आहे की, ते काश्मीरच्या लोकांची काळजी करत नाहीत असे या अॅक्टीव्हिस्टनी म्हटले आहे.



लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

युएईने ही गुंतवणूक भारतासोबत आपले राजकीय आणि आर्थिक संबंध सुधारण्यासाठी मुस्लिमांना आपले समर्थन देणे बंद केले आहे.

पाकिस्तानमधील इस्लमाबादमध्ये असणाऱ्या सेंटर ऑफ पीस डेव्हलपमेंट अॅंड रिफॉर्म्स संस्थेचे कार्यकारी निर्देशक इरशाद यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. मला याचा धक्का बसला आहे. काश्मीरच्या लोक आणि त्यांच्या संघर्षासोबत धोका दिल्याचे दिसत आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, युएईचा हा निर्णय भारताच्या उद्दिष्टांना मजबूत करतो. काश्मीर भारताचा भाग असल्याच्या म्हणण्याला युएईचे हे पाऊल मजबूत करते आणि आमच्या प्रयत्नांना नाकारते असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील अनेक अॅटीव्हिस्ट संस्थांनी युएईवर नाराजी व्यक्त केली आहे

याबरोबरच ब्रिटिश कार्यकर्ता फहीम कयानी यांनी म्हटले आहे की, युएईच्या कंपनीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करणे हे भारताच्या सॉफ्ट पॉवरचा हा परिणाम आहे. आणि संपूर्ण जगासाठी ही एक चेतावणी आहे असे म्हटले आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून काश्मीरचा प्रदेश आपल्या देशाचा भूप्रदेश आहे असे दोन्ही देश दावा करत असतात. काश्मीरच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील वाद सुरु असतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button