ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

400 लोकांना घेऊन जाणारं जहाज बुडालं..


माल्टा : एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 400 लोकांना घेऊन जाणारं जहाज बुडाल्याची माहिती मिळाली आहे. ही 400 लोक समुद्रातून जहाजाने प्रवास करत असताना ही धक्कादायक घटना समोर आली.ग्रीस आणि माल्टा दरम्यानच्या समुद्रात एक जहाज बुडाले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, तर २० हून अधिक प्रवासी बेपत्ता आहेत. जहाजावर 400 हून अधिक प्रवासी होते. लिबियातील टोब्रुक इथून ही बोट निघाली होती.

सपोर्ट सर्व्हिस अलार्म फोनने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार एका रात्रीत लिबियातील टोब्रुक येथून निघालेल्या बोटीसोबत दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. मात्र तातडीने मदकार्य पोहोचण्यात काही अडचणी येत होत्या. जर्मन एनजीओ सी-वॉटर इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार जहाज ज्या ठिकाणाहून जात होती तिथे मृत्यूचा सापळा असल्याचं म्हटलं, त्यामुळे मदत करण्यासाठी देखील उशीर होत होता. त्यांनी EU ला पुढील कारवाई आणि मदकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. या जहाजाचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. नेमकं काय घडलं ज्यामुळे ही बोट बुडाली याबाबत अजून काही समजू शकलं नाही.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button