ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

हा तर चमत्कार!130 वर्षांनी जन्माला आल बाळ ! मुलीचा जन्म होताच या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला..


कोणत्याही जोडप्यासाठी आई-वडील होण्याचा आनंद हा जगातील सर्व आनंदापेक्षा मोठा असतो. हा क्षण त्या दोघांसाठीच नव्हे तर दोघांच्या कुटुंबासाठीही खास असतो.आपल्या घरात एक नवा पाहुणा येणार, यासाठी सर्वजण त्याच्या स्वागताची तयारी करतात. पण अमेरिकेतील एका कुटुंबात अशा नव्या पाहुणा म्हणजे एक चमत्कारच ठरला. बाळाच्या जन्माचा आनंद या कुटुंबासाठी एक अनोखी घटना ठरली. तब्बल 130 वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबात असं बाळ जन्माला आलं.

यूएसच्या मिशिगनमध्ये राहणारी कॅरोलिन आणि तिचा नवरा अँड्य्रू क्लार्क 17 मार्चला आईबाबा बनले. पहिल्यादाच ते पालक झाले. 2021 मध्ये कॅरोलिनचा गर्भपात झाला होता. त्यामुळे हे मूल त्यांच्यासाठी खूप खास होतंच.

पण बाळाच्या जन्मानंतरही या मुलाने कुटुंबात चमत्कार घडवला. 130 वर्षांनी पहिल्यांदाच या कुटुंबात असं काही घडलं होतं. हे बाळ म्हणजे एक मुलगी होती. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अँड्र्यूच्या कुटुंबात गेल्या 130 वर्षांपासून मुलगी झाली नाही.

गूड मॉर्निंग अमेरिका या वेबसाईटशी बोलताना या जोडप्यानं सांगितलं की, जेव्हा 10 वर्षांपूर्वी ते एकमेकांना भेटले तेव्हा अँड्र्यूने कॅरोलिनाला त्यांच्या कुटुंबात एकाही मुलीचा जन्मच झालेला नाही, हे सांगितलं. 1885 साली शेवटची मुलगी जन्माला आली होती.

कॅरोलिनाला यावर विश्वासच बसला नाही. तिने अँड्र्यूच्या पालकांना विचारलं, तेव्हा तिची खात्री पटली. पाश्चात्य देशांमध्ये प्रेग्नन्सीच्या कालावधीत बाळाचं लिंग निदान करण्यासाठी पार्टी आयोजित केली जाते. या पार्टीत कॅरोलिनाला क्रीमचं बिस्कीट खायला देण्यात आलं.

बिस्किटातील क्रीमच्या रंगावरून बाळाचं लिंग सांगितलं जाणार होतं. त्यावेळी कॅरोलिनाच्या बिस्किटात गुलाबी रंगाची क्रीम होती. जे पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. पण तरी मुलाचाच जन्म होईल, असं कुटुंबाला वाटलं.

पण मुलगी जन्माला आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
सुरुवातीला घरच्यांचा विश्वासच बसत नव्हता. पण मुलीचा जन्म होताच या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button