नजरचूक बेतली महिलेच्या जिवावर; ‘बीपी’ची समजून घेतल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सेलू : उच्च रक्तदाब या आजाराचे नियमितपणे औषध घेणाऱ्या महिलेने नजरचुकीने उंदीर मारण्याच्या घेतले. त्यानंतर या महिलेला तत्काळ परभणी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रियंका संतोष टेकाळे (रा. वालूर) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

वालूर येथे प्रियंका संतोष टेकाळे (२८) या महिलेने नियमितपणे घेत असलेले बीपीच्या औषधी गोळ्या समजावून नजरचुकीने ४ एप्रिल रोजी सायंकाळी उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या खाल्या. काही वेळाने महिलेस उलटी होऊन त्रास सुरू झाल्याने वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला. त्यानंतर महिलेस परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, या महिलेची प्रकृती चिंताजनक होत असल्याने पुढील उपचारासाठी ५ एप्रिल रोजी परभणीहून छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना वाटेतच या महिलेची प्राणज्योत मालवली. केवळ नजरचूक जिवावर बेतल्याची दुर्घटना वालूर येथे समजताच शोककळा पसरली. अनिल शामराव टेकाळे यांनी खबर दिल्यावरून सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांंनी दिली आहे. तपास पोहेकाँ अशोक हिंगे हे करीत आहेत.