शरिरसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून महिलेला फोटो व्हारल करण्याची धमकी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चिंचवड:इनस्टाग्राम वरून ओळख वाढवून महिलेचा आर्थिक फसवणूक तसेच लौंगिक अत्याचार केले. तसेच पुढे शारिरीक संबंध ठेवले नाहीस तर न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमी दिली.
हा प्रकार 2021 ते मार्च 2023 या कालावधीत चिंचवड व लोणावळा येथे घडला आहे.

याप्रकऱणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गौरव पाटील (रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची इन्स्टाग्रामवरून आरोपीशी ओळख झाली. त्याने फिर्यादीला लग्नाची मागणी घातली, पुढे त्याने वेगवेगळ्या अडचणी सांगून 5 लाख 25 हजार रुपये तसेच 5तोळ्याचे सोन्याचे गंठण फिर्यादी यांच्याकडून घेतले.

लग्नाचे आमिष दाखवत फिर्यादी यांच्यावर लैंगिक आत्याचार केले. फिर्यादी यांनी शारिरीक संबंधास नकार दिला असता न्यूड फोटो नवरा, नातेवाईक यांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच व्हॉटसअपवर फिर्यादी यांची बदनामी केली. यावरून चिचंवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.